विष्णू बुरगे, झी २४ तास,  बीड : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. बीड ( Beed) जिल्ह्यात आंबेजोगाई येथे एकाचवेळी 8  जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.  (COVID-19 । Funeral of 8 persons at Ambejogai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच चितेवर आठ जणांना अग्निमुख देण्यात आले. काल दिवसभरात दहा जणांचा मृत्यू झाला.  आंबेजोगाई शहर कोरोनाचा  हॉटस्पॉट बनले आहे. मांडवा येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आहे. येथे कोरोना बधितांबरोबर मृतांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. एका रुग्णालयातील सात आणि एका कोविड सेंटरमधील एक अशा आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (COVID-19 । Funeral of 8 persons at Ambejogai in Beed district)



दरम्यान, बीड जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्याचे कुलूप अर्धवट उघडले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, सार्वजनिक ठिकाण बंदच राहणार आहेत. जिल्ह्यात रात्रीच्यावेळी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहेत. लग्नासाठी  स्थानिक पोलिस निरीक्षकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 


तर  जिल्ह्यामध्ये व्हॅक्सिनेशनसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात 129 ठिकाणी व्हॅक्सिनेशन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.  45हून अधिक वय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.