मुंबई : जळगाव जिल्ह्यात मागील २ वर्षात शेतकऱ्यांच्या दुभत्या गाई चोरुन नेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे हे बहुतांश शेतकऱ्यांच्या गाई चोरणारे चोरटे हे धुळ्यात पकडले जातात, तेथे राहतात. अटकेनंतर कोर्टाकडून त्यांचा ताबा पोलिसांकडे चौकशीसाठी दिला जातो, या चौकशीत अनेक गोष्टी ज्या बाहेर यायल्या हव्यात त्या येतच नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोरट्यांनी गाई पिकअप गाडीने, क्रुझर तर कधी स्कार्पिओने देखील चोरुन नेल्या आहेत. यात योगायोग म्हणा किंवा आणखी काय म्हणता येईल ते म्हणा...पोलिसांची किमया फार मोठी आहे.


जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात गाई चोरीला जात आहे. हे चक्र थांबण्याच नाव घेत नाहीय. 


एका प्रकरणात कसायांनी शेतकऱ्यांच्या गाई चोरल्या. गुन्हा दाखल झाला,जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने याचा छडा देखील लावला. गाय चोरणारे सापडले, त्यांची चौकशीत अनेक प्रश्नसमोर आले, पण त्यांची उत्तरं समोर न आल्याने हे चोरीचं चक्र थांबत नाहीय.


तपासाच्या दृष्टीकोनातून खालील माहिती समोर न आल्याने हे रॅकेट वाढतंच चाललंय


१) शेतकऱ्यांच्या गाई चोरीसाठी वापरलेली गाडी कुणाची होती?


२) शेतकऱ्यांच्या गाई चोरण्यासाठी वापरलेली गाडी चोरीची होती, तर गाडी कुठून आणि किती वाजता चोरली, कोणत्या मार्गाने आली, त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज घेतले का? न्यायालयासमोर सादर केले किंवा मीडियाला दिले का?


३) गाडी चोरीनंतर गाडीमालकांनी किती तासांनी आणि कोणत्या पोलिस स्टेशनला आणि किती वाजता तक्रार द्यायला मालक दाखल झाला, याचे सीसीटीव्ही पोलीस स्टेशनचे फुटेज घेतले का? न्यायालयासमोर वेळ सादर केली का?


४) या चोरीत काही स्थानिक कसाई रात्री तुम्हाला रस्ता दाखवतात का? या विषयी चोरट्यांना माहिती विचारली का? 


५) एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून गाई खरेदी करणारा तो कोण?


६) तुम्ही दिवसाच शेतकऱ्यांच्या गाईंची रेकी करुन ठेवतात का?


६) स्थानिक लोकप्रतिनिधी, किंवा इतर व्यक्ती आरोपींच्या बाजूने पोलिसांवर दबाव आणतात का? त्यांनाही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं का?


 शेतकऱ्यांच्या गाई हे चोर ज्याला विकतात, तो एवढ्या गाईंचं काय करतो, तो कोणत्या शहरात कत्तलखाना किंवा त्यासारख्या गोष्टी करुन गाईंची हत्या करतो, त्याचं नाव अजून कसं समोर येत नाही, तो सर्वात क्रूरकर्मा कसाई कोण हे मात्र समोर येऊ शकलेलं नाही.


वरील कोणतीही माहिती आरोपींच्या चौकशीत समोर आलेली नाही, आरोपींना शिक्षा आणि रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी ही माहिती न्यायालयात महत्त्वाची ठरते, पण असं होत नसल्याने हे रॅकेट आणखी फोफायवतंय.यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांची तपासाची भूमिका अधोरेखित होत आहे.


गाई चोरणारे ४ कसाई सापडले म्हणजे विषय संपला असं होत नाही. यामागे कोण आहे, या गाईची कत्तल किंवा तस्करी कोण करतं, हे काम कुठं चालतं, हे सर्वसमोर यायला हवं, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.