पालघर, झी मीडिया, हर्षद पाटील : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो व्यक्ती जिवंत सापडला आहे (Cremated person found alive) . पालघरमध्ये (Palghar) ही आश्चर्यकारक (shocking) घटना घडली आहे. या व्यक्तीचे अपघाती निधन झाले होते. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्याची पत्नी अत्यंविधीसाठी गावावरुन आली होती. मात्र, दफनविधी नंतर हा व्यक्ती असल्याची माहिती समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

29 जानेवारी 2023 रोजी बोइसर रेल्वे स्थानकाच्या परिसरात ट्रेनचा धक्का लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन दफनविधी करत अत्यंसंस्कार केले. मात्र,  हा व्यक्ती जिवतं असल्याचे समोर आले. 


नेमकं काय घडलं?


29 जानेवारी 2023 रोजी बोइसर रेल्वे स्थानकात अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. यावेळी मृत व्यक्तीची ओळख पटली आणि त्याचे नाव रफिक शेख असल्याचे समोर आले. या मृतदेहाचा चेहरा हा रफिक शेख नावाच्या व्यक्तीशी साधर्म्य साधणारा होता. यामुळे रफिकचे कुटुंबीय आणि नातलगही मृदेहाची ओळख करताना फसले. 


रफिकच्या अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. रफिक शेखच्या पत्नीला केरळहून मुंबईला बोलावण्यात आले. यानंतर तीन दिवसांनी रफीक यांच्यावर प्रथेनुसार दफन विधी करण्यात आले. 
रफिने मित्राला व्हिडिओ कॉल केला


रफीक यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक सर्वच शोकात होते. याच दरम्यान रफिक शेख यांनी आपल्या एका मित्राला व्हिडिओ कॉल केला. रफिकला पाहून त्यांच्या मित्राला धक्काच बसला. मित्राने ही गोष्ट लगेच त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. हे ऐकून रफिकच्या कुटुंबीय आनंदीत झाले. 


तो मतृदेह रफिकचा नव्हता मग कोणाचा होता?


ज्या व्यक्तीला दफन केले गेले, तो रफिक नसून दुरचं कोणीतरी असल्याचे समोर आले. महिन्यांपूर्वी रफिक शेख हे काही कारणांमुळे कुटुंबाला सोडून निघून गेले होते. त्यांचा खूप शोध घेतला. पण त्यांचा पत्ताच लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. पण नंतर त्यांच्या बाबात माहिती समोर आली. पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे मुलांच्या अनाथ आश्रमात रफिक शेख काम करत असल्याचे स्पष्ट झाले. रफिक शेख आपल्या कुटुंबात पुन्हा परतले आहेत. पण रफिक शेख समजून ज्या व्यक्तीला दफन करण्यात आलं, तो मृतदेह कुणाचा आहे? आता याचा तपास करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.