मालेगाव: राईनपाड्याची घटना अगदी ताजी असताना, मालगेवामध्येही रविवारी अगदी तसाच प्रकार घडला. पण समजदार नागरिकांच्या प्रसंगावधानानं जीवितहानी टळली.. मालेगावातल्य़ा अली अकबर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या आझादनगर भागात मुले पळवणारी टोळी समजून चार जणांना जमावाने बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौघांना जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला.


जमावाकडून पोलिसांच्या गाडीची मोडतोड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीची मोडतोड केली. अखेर पोलिसांनी जमावाची समजूत काढून त्यांना शांत करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यांच्या तावडीत असलेल्या  चौघांना ताब्यात घेतले.चौघेही परभणी जिल्ह्यातील असल्याचे समजते.


अफवेतून घडणाऱ्या प्रकाराने धारण केले विकृत रूप


मुलं पळवणारी टोळी गावात आल्याच्या अफवेतून मारहाण करण्याच्या प्रकाराने विकृत रूप धारण केलं. धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथे या अफवेतून पाच जणांना अतिशय निर्घृण मारहाण करण्यात आली. त्यात या पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर  पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले .पोलिसांनी आता धरपकड़ सुरु केल्याने  गावातील  पुरुष मंडळी फरार झाली असून गावात शुकशुकाट पसरलाय. अनेक घरांना कुलुप लावण्यात आलेत.