Beed Crime News : बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर मोठा हल्ला झाला आहे ( Naib Tehsildar Asha Wagh of kaij in Beed). भररस्त्यात त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला (Attempt to burn alive). या घटनेतून  आशा वाघ थोडक्यात बचावल्या असल्यातरी त्या जखमी झाल्या आहेत. आशा वाघ यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे बिड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे (Beed Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशा वाघ या केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आहेत. शुक्रवारी त्यांच्यावर हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यातून आशा वाघ या थोडक्यात बचावल्या आहेत.  असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


नेमकी काय आहे घटना


आशा वाघ या शुक्रवारी दुपारी दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे जात होत्या. याचवेळी हल्लेखोरांनी हल्लेखोरांनी भर रस्त्यात त्यांना अडवले आणि त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आशा वाघ यांच्यावर हल्ला करुन हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. 


प्रत्यक्षदर्शी आशा वाघ यांच्या मदतीला धावून आले. तात्काळ आशा वाघ यांना उपचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 
यापूर्वीही झाला होता आशा वाघ यांच्यावर हल्ला


यापूर्वी देखील आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला होता. जून 2022 मध्ये आशा वाघ यांच्या डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारानंतर त्या पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्या होत्या. 


सख्या भावानेच केला होता हल्ला


आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ यानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.  कौटुंबिक कलहातून आणि शेतीच्या वादातून आशा वाघ यांच्या भावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. यामुळे आता झालेला हल्ला देखील मधुकर वाघ यानेच केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.