Ulhasnagar Sister Murder: प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होते म्हणून भावाने 12 वर्षाच्या बहिणीसह भावाने अत्यंत धक्कादायक कृत्य केले आहे. उल्हालनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भावाने केलेल्या अत्याचारात या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. आरोपीचे कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने हे कृत्य केल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


बहिणीला बेदम मारहण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत मुलगी अल्पवयीन असून ती फक्त 12 वर्षांची होती. आरोपी भाऊ तिला सलग चार ते पाच दिवस बेदम मारहाण करत होता. याच मारहाणीत या मुलीचा मृत्यू झाला आहे. आरोपीने बहिणीला मारहाण करण्यामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे. ब्रिजेश शुक्ला असे आरोपी भावाचे नाव आहे.


बहिणीच्या चारित्र्यावर संशय 


आरोपीने अवघं 12 वर्षे वय असेलल्या आपल्या लहान बहिणीवर संशय घेतला. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन या भावाने सलग चार दिवस तिला लाथा बुक्क्यांनी, स्टीलच्या पकडीने तोंडावर ,पाठीवर आणि शरीराच्या इतर ठिकाणी बेदम मारहाण केली.त्यामुळे तिचा मृत्यू झाला.


मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून येत होते रक्त 


मृत मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होते. त्याबाबत ब्रिजेश शुक्ला याने तिला विचारना केली. मात्र, पीडित मुलीने काहीही बोलत नव्हती,त्यामुळे संतापलेल्या ब्रिजेशने राहत्या घरी या 12 वर्षाच्या बहिणीला सलग चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. दरम्यान मारहाण केल्यानंतर त्याने तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी ब्रिजेशला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान या हत्येने उल्हासनगर शहर हादरलं असून निर्दयी भावाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.


शिर्डीत 14 वर्षीय मुलीकडून वेश्याव्यवसाय


दोन दिवसांपूर्वी शिर्डीतील सहा हाॅटेलवर वेश्याव्यवसाय सुरू असताना एकाचवेळी छापेमारी करत पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने 15 मुलींची सुटका केली होती. तर, 11 आरोपींना गजाआड केले होते. यातील हाॅटेल एसपी येथे एका अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याच समोर आले. सुटका करण्यात आलेल्या मुलींमध्ये एक 14 वर्षीय मुलगीही मिळून आल्याने हाॅटेल चालकासह इतरांवर बाललैंगिक शोषण आणी भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.