निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : सख्ख्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मालेगावात (Malegaon Crime) घडली आहे.सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Malegaon Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृताच्या मोठ्या भावाला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सख्ख्या भावानेच चाकू भोकसून 23 वर्षीय तरुण भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या मालेगावातील नूरबागमध्ये समोर आली. जाविद अहमद मोहम्मद जमील असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयित मोठा भाऊ मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील व मृत जाविद यांच्यात सतत भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित मुद्दसीरला अटक केली आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.


हत्या करून फरार झालेली संशयीतला अटक


अडीच वर्षांपूर्वी पत्नीची हत्या करून फरार असलेल्या संशयित आरोपीला मनमाड पोलिसांना सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावातून शिताफीने अटक केली. रमेश जाधव असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून पत्नी फुलाबाईसोबत मनमाडच्या रेल्वे क्वॉटरच्या पडक्या घरात राहत होता .नवरा बायकोमध्ये होणाऱ्या वारंवार भांडणातून 11 जानेवारी 2021 रोजी रात्री रमेशने धारधार हत्याराने पत्नी फुलाबाईच्या डोक्यावर व कपाळावर वार करत हत्या करून फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. केशभूषा,पेहराव बदलून व खोटे नाव धारण करून तो वेळापुरात राहत होता. त्याच्यावर परभणी व औरंगाबादमध्ये विविध गुन्ह्यांची नोंद देखील आहे. तसेच रेल्वेमध्ये चोरीचे गुन्हे देखील दाखल आहेत.