AI Deepfake WhatsApp: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हा जगभरात चर्चेचा विषय राहिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे संपूर्ण जग नवीन क्रांती म्हणून पाहत आहे. अनेक मोठ्या प्रकल्पात एआयच्या मदतीने काम देखील सुरू झालंय. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर एआयचा दुरूपयोग होत असल्याचं दिसून येतंय. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार काही नवे नाहीत. मात्र, आता नवा स्कॅम होत असल्याचं समोर आलंय. तुमच्यासोबत देखील असा प्रकार होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विज्ञान श्राप कि वरदान? असा सवाल नेहमी विचारला जातो. त्याचं उत्तर अजूनही कोणाला मिळालं नसावं. अशातच एआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत असल्याचं समोर आलंय. हा घोटाळा बनावट व्हिडिओ कॉलद्वारे करण्यात येतो. बनावट व्हिडिओ कॉलसाठी घोटाळेबाजाने एआय डीपफेक (AI DeepFake) तंत्रज्ञानाची मदत घेतात, त्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. अशातच एक धक्कादायक घटना केरळमधून (Kerala Crime News) समोर आली आहे.


केरळमधील एका व्यक्तीला व्हॉट्स अॅपवर व्हिडीओ (whatsapp video) कॉल करून 40 हजारांना चुना लावल्याचं समोर आलं आहे. केरळा पोलिसांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याची माहिती शेअर केली आहे. कोझिकोडमध्ये राहणाऱ्या राधाकृष्णन याला त्याच्या आंध्रप्रदेशमध्ये राहणाऱ्या सहकाऱ्याचा फोन आला. त्याने फोन उचलल्यावर त्याचा चेहरा समोर दिसला. चोरट्यांनी एआयच्या मदतीने चेहरा बदलला होता. चेहरा समोर दिसल्यावर मित्राने गप्पा मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळाने तो मेन मुद्द्यावर आला. मी सध्या दुबई असून माझे नातेवाईक इथल्या रुग्णालयात आहे. सध्या मला 40 हजार रुपयांची गरज आहे. मदत करशील का? असा सवाल विचारला. त्यावर मित्राच्या नात्याने राधाकृष्णन याने मदत केली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याचाच कॉल आला आणि 35 हजारांची मदत मागितली. त्यावेळी राधाकृष्णन याला संशय आला.


आणखी वाचा - AI Photo Of Sonu Sood: दानशूर अभिनेता सोनू सूद मल्टीवर्स कलाकार असता तर?


राधाकृष्णन यांनी ओरिजनल नंबरवर कॉल केला आणि विचारणा केली. त्यावेळी झालेला सर्व प्रकार राधाकृष्णन यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ केरळच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली अन् तक्रार दाखल केलीये. महाराष्ट्रातील एका छोट्या बँकेतून पैसे वळवले जात होते. बँक अधिकाऱ्यांनी कारवाई करत अकाऊंट बंद केलं. त्यानंतर केरळ पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्कतेचं आव्हान केलं आहे.