Akola Crime News: अकोल्यात एक मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तीन महिन्यांनंतर चिमुकलीच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Mother Killed Daughter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्यात आईच्या नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आईने हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलिसही हादरले आहे. आईच आपल्या पोटच्या लेकराची मारेकरी निघाली आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्याने हत्येचा खुलासा झाला आहे. 


काय घडलं नेमकं?


2 जूनला नाकाला चिमटा लावून मुलगी झोपली होती. नाकाला चिमटा तसाच लागून असल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या आईने रचला होता. मयत मुलीचे नाव किशोरी असे असून तिचे वय साडे पाच वर्ष इतके होते. किशोरीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने खोटे खोटे अश्रूदेखील ढाळले होते. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हत्येचा उलगडा झालाच. या प्रकरणात आज पोलिसांनी किशोरीची आई विजया हिला ताब्यात घेतले आहे. 


किशोरीचे वडील रवी आमले यांनीच दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी किशोरीच्या आईच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील बलोदे लेआऊट मधील ही घटना घडली आहेय...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नापासूनच पती पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीकडे घटस्फोटाची मागणी सुद्धा केली होती. मात्र आई वडिलांच्या या वादाची बळी किशोरी ठरली आहे. 


किशोरीच्या वडिलांनी यासंदर्भात आधीच पोलिसांना सावध केले होते. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीचे पोस्टमार्टम केले आणि तब्बल तीन महिन्यानंतर तपासात अनेक नवे खुलासे समोर आले आहेत. नाकाला चिमटा लावल्याने किशोरीचा मृत्यू झाल्याचा देखावा रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये  तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा सुद्धा स्पष्टपणे अधोरेखित झाल्याचे चित्र आहे. पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणात किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यात घेतलं आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत.