सागर आव्हाड, झी मीडिया: हल्ली सगळीकडेच रॅप सॉन्गच (Rap songs) वारं फिरत आहे. त्यामुळे सगळीकडे याचीच चर्चा असते. आजकाल सोशल मीडियावरही (Social Media) रिल्सच्या माध्यमातून (reels) अनेक जण रॅप सॉन्ग्स तरी बनवत असतात. हे रिल्स सगळीकडेच व्हायरल (Viral) होत असतात. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा लागून राहते. यामुळे सध्या रॅप सॉन्ग्स (Rap Songs on Internet) यांच्या कलात्मकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागला आहे. सध्या असंच एक रॅप सॉन्ग सगळीकडे फेमस होत असतात त्यामुळे सगळीकडे (Crime News) एकच खळबळ उडाली आहे. (crime news police captures a boy who makes rap song which hurts the people sentiments)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''तुझ्या घरात नाही गहू, म्हणे एलसीडी घेऊ, तुझी जागीरदारी, हा तुझी भाईगिरी, इकडे आला तर खाशील मार, अप्परची पोर गुन्हेगार'', अशा प्रकारचं गाणं तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात (Crime in pune) आला आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक महबूब शेख (रा. काकडे वस्ती, गल्ली नंबर एक, अप्पर इंदिरानगर पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अप्पर मध्ये रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडण्याचे प्रकार वाढत आहेत मुलींना पाहून शिट्टी मारल्या जात आहेत या त्रासाला अप्पर मधील महिला वैतागले असून बिबेवाडी पोलिसात वेळोवेळी तक्रारही दाखल करण्यात आल्यात मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे. 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


ऋतिक शेख हा पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात राहतो. त्याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांना घेऊन त्याने डॉल्फिन चौकाजवळ अशा प्रकारचं रॅप सॉंग (Rap song on instagram) तयार केलं होतं. तु मेला मी घेऊन येईल हार, कारण माझा हूर मला देतोय आधार, तुझी नाही माझ्यासमोर लायकी, मी नी पायात घातली नाईकी, मी पोरगा जरा सनकी. त्यासोबतच काही अश्लील शब्द या व्हिडिओत (Video) त्याने वापरले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली आणि आरोपी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर परिसरामध्ये मुलींना पाहून शिट्ट्या वाजण्याचे प्रकारही घडत आहेत या संदर्भात बिबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊनही टवाळकी करणाऱ्या तरुणांवर कारवाई होत नाही.