Crime News : गंमतीगंमतीत प्रेयसीचा खेळ खल्लास; प्रियकराने रचलेला बनाव पाहून पोलिसही सुन्न
Crime News : तब्बल 14 महिन्यानंतर पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर दोघेही एकमेकांसाठी जीव देण्यासाठी तयार झाले होते. मात्र मुलाने नाटक केले आणि अल्पवयीन मुलीने हे नाटक सत्यात उतरवले
Crime News : अमरावतीच्या (Amravati News) अचलपूरमध्ये 25 नोव्हेंबर 2021 रोजी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात आता तब्बल सव्वा वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 10 जानेवारी रोजी या अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) एका तरुणाविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच अमरावती पोलीस उत्तर प्रदेशात जाऊन या तरुणाची चौकशी करणार आहे. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण आकस्मिक मृत्यूचे असल्याचे समजून तपास सुरु केला होता. मात्र मुलीच्या फेसबुक (Facebook) व व्हॉट्सॲप चॅटवरून या प्रकरणाचा उलघडा झाला आहे.
मुलाने केलेले नाटत मुलीने सत्यात उतरवले
अमरावतीच्या 16 वर्षांच्या मुलीची उत्तर प्रदेशातील 20 वर्षांच्या तरुणासोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. या प्रेमसंबंधांदरम्यान आपण एकमेकांसाठी जीवही देऊ शकतो, अशा प्रकारचा त्यांच्यात संवाद सुरू झाला. दरम्यान, तरुणाने फाशीचे नाटक करून तो व्हिडिओ आपल्या अल्पवयीन मुलीला पाठवला होता. अल्पवयीन प्रेयसीनेही आपणही असाच व्हिडीओ पाठवू असे सांगितले. यानंतर मुलीने फाशी घेतली. घरी कोणीच नसल्याचे मुलीने फाशी घेताच तिचा मृत्यू झाला. मुलाने केलेले नाटत मुलीने सत्यात उतरवले. यानंतर मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होता.
प्रत्यक्ष न भेटताही एकमेकांसाठी जीव द्यायला झाले तयार
ही खळबळजनक घटना 14 महिन्यांपूर्वी अचलपूर तालुक्यात घडली होती. या प्रकरणी कसून तपास केल्यानंतर परतवाडा पोलिसांनी मंगळवारी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेभापती लालाराम असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुण हा उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. 3 वर्षांपूर्वी मृत अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियावर बेभापतीशी ओळख झाली होती. दोघांची एकमेकांशी कधीच भेट झाली नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही प्रेमात पडले आणि एकमेकांसाठी जीव देऊ शकतो असे बोलू लागले. 25 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांमध्ये मोबाईलवर चॅटिंग सुरू केले. त्यानंतर तरुणाने अल्पवयीन मुलीला मी तुझ्यासाठी आपला जीव देऊ शकतो असे सांगितले. काही वेळातच मुलीच्या मोबाईलवर फाशी घेतल्याचा खोटा व्हिडीओ पाठवला.
यामुळे अल्पवयीन मुलीनेही फाशीचे नाटक करण्याचा प्रयत्न केला. पण हे नाटक खरे ठरले. काही वेळाने मुलीची आई घरी पोहोचली असता तिला मुलगी मृतावस्थेत दिसली. याप्रकरणी पोलिसांनी त्यावेळी आकस्मिक घटनेची नोंद करून तपास सुरू करण्यात आला होता. मात्र काही दिवसांनी परतवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संदीप चव्हाण यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. चव्हाण यांनी मृत्यू झालेल्या मुलीच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली. व्हॉट्सॲप व फेसबुक चॅट या घटनेचा उलगडा झाला.
यानंतर त्या क्रमांकाची माहिती काढून परतवाडा पोलिसांनी कानपूर पोलिसांशी संपर्क साधला बेभापती लालारामची माहिती मिळवली. यानंतर मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.