महिलांवरील अत्याचार कुणीच थांबवू शकत नाही का? नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची धक्कादायक आकडेवारी
बदलापुरातील प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने महिलांवरील अत्याच्याराच्या घटनांची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी भयावह आहे.
Crime Rate Against Women in Maharashtra: महिलांवरील अत्याचार कुणीच थांबवू शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित करणारी अपडेटसोमर आली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) ने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारीने अतिशय धक्कादायक आहे. कोविड काळात संपूर्ण देश बंद असताना देखील महाराष्ट्रात महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांमध्ये घट होण्याऐवजी वाढच झाली.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या काळात, कोविड लॉकडाऊन दरम्यान, महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या दररोज सरासरी 109 घटना नोंदवल्या जात होत्या. आजही महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत नविन आकडेवारीवरु हे दिसून येत आहे.
लॉकडाऊनमध्ये महिलांविरुद्ध अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. 2020 च्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात 31,701 महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. प्रतिदिन 88 महिला अत्याचाराला बळी पडत होत्या. मात्र, 2021 मध्ये हा आकडा 39,266 वर पोहोचला. दररोज महिला अत्याचाराच्या 109 घटना नोंदवल्या गेल्या.
महायुती सरकारच्या काळात जानेवारी ते जून 2022 या महाविकास आघाडीच्या काळात प्रतिदिन 126 महिला अत्याचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या. तर, जुलै ते डिसेंबर 2022 या महायुती सरकारच्या काळात ही संख्या किंचित कमी होऊन 116 वर आली. मात्र, 2023 मध्ये ही सरासरी पुन्हा 126 वर गेली, ज्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेची स्थिती अजूनही गंभीर आहे.
पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांमध्ये वाढ विशेषतः अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या (पॉक्सो कलम 12) गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. 2021 पासून हे गुन्हे 249 वर गेले असून, 2022 मध्ये ते 332 वर पोहोचले आहेत.
मुंबईतील आकडेवारी देखील चिंताजनक आहे. मुंबईत 2023 मध्ये पॉक्सो अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. 2020 मध्ये 445 बलात्काराच्या घटना नोंदल्या गेल्या होत्या, तर 2021 मध्ये हा आकडा 524 वर गेला होता. 2023 मध्ये हा आकडा काहीसा कमी होऊन 590 वर आला आहे. गुन्ह्यांची वाढती आकडेवारी पाहिली असता महिला सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.