दशक्रिया | ब्राह्मण महासंघ-संभाजी ब्रिगेड आमने-सामने
संभाजी ब्रिगेडने चित्रपटगृहाला सुरक्षा देऊ पण चित्रपट सुरू ठेवा अशी मागणी प्रशासनाकडे केली.
औरंगाबाद : दशक्रियावरून ब्राह्मण महासंघ-संभाजी ब्रिगेड आमने-सामने आले. संभाजी ब्रिगेडने चित्रपटगृहाला सुरक्षा देऊ पण चित्रपट सुरू ठेवा अशी मागणी प्रशासनाकडे केली.
पहिल्यांदाच या संघटना आमने-सामने
मात्र यानंतरही ब्राह्मण संघाने घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने चित्रपटाचा शो बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने तुर्तास घेतला आहे. ब्राह्मण महासंघ आणि संभाजी ब्रिगेड आमने-सामने येण्याची ही पहिलीच घटना असावी.
प्रोझोन मॉलमधील शो बंद पाडला
दशक्रिया चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आज औरंगाबादमध्ये विरोधकांनी प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात शो बंद पाडलाय. बाह्मण संघाच्या आंदोलकांनी आज दुपारी मॉलच्या बाहेर आंदोलन केलंय. आंदोलनानंतर आजचे या मॉलमध्ये होणारे शोज रद्द करण्यात आले आहेत.
औरंगाबाद खंडपिठाने याचिका फेटाळली
दरम्यान आज सकाळी राष्ट्रीय पुरस्कार विजेता दशक्रिया या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली आहे.
एका दिवसात निकाल देणे अशक्य
एका दिवसात अशी याचिका स्वीकारून निकाल देणं अशक्य असल्याचं खंडपीठानं म्हटलं आहे. याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. शिवाय पैठणच्या ब्राह्मण संघानं ही याचिका दाखल केली होती. आज हा चित्रपट महाराष्ट्रसह देशभरात प्रदर्शित झाला आहे.