COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर : वरोरा शहरातील आनंदवन परिसरातील मोठ्या तलावाजवळ महाकाय मगर आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका सिमेंटच्या टाक्यात ही मगर पडून होती. २०० किलो वजनाच्या ८ फूट लांब मगरीची वनविभाग आणि वन्यजीव संस्था संघटनांनी सुटका केली. जगप्रसिद्ध आनंदवन परिसरात मगर असल्याची माहिती वरोरा वनविभागाला मिळाली होती. वनविभागाने या माहितीच्या आधारे मोठ्या तलावाच्या परिसराची पाहणी केली. सुर्ला-आनंदवन बिट परिसरात एका मोठ्या सिमेंट टाक्यात हे मगर आढळून आले. APAS या वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या सहाय्याने या मगरीला बाहेर काढले. 


ही संपूर्ण कारवाई मोठ्या शिताफीने केली गेली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी हे अभियान पूर्ण केले. हे मगर सुमारे आठ फूट लांब व 150 ते 200 किलो वजनाचा आहे. या मगराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. याची नोंद करून हा मगर तलावात सोडण्यात येणार आहे. आनंदवनच्या आसपास मोठी नदी अथवा नाला नसल्याने ही महाकाय मगर या भागात कुठून आली असावी याचा तपास वनविभाग करत आहे.