मुंबई : शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा भरायला मुदतवाढ देण्यात आली आहे. पंतप्रधान कृषी पीक विमा योजना २०१७ ची अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१जुलै २०१७ पर्यंत होती.  परंतु बँकेसमोर इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांचे बरेच अर्ज राहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज ५ ऑगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारले जातील.
या साठी csc केंद्र अधिकृत राहणार नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकांना याबाबत इ मेल द्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्या मार्फत सूचित करण्यात येत आहे, असे राज्याचे कृषी मंत्री श्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले आहे. शेतकऱ्यांनी काळजी न करता विमा अर्ज या मुदतीत भरावे आणि या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.