पिकविम्यावरून उस्मानाबादमध्ये कृषि कार्यालयाची तोडफोड
उस्मानाबाद जिल्हयातील सोयाबीनचं दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे 100% नुकसान झालं.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हयातील सोयाबीनचं दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे 100% नुकसान झालं. शासनाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन नुकसान भरपाई आणि पिक विमा द्या, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं.
जिल्हा अध्यक्ष रविंद्र इंगळे हे आपल्या कार्यकत्यांसह जिल्हा कृषी उप संचालकांच्या कार्यालयात गेले, निवेदन दिले. पण अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली तसेच घोषणाबाजी केली.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही पिकविमा कंपन्यांकडून भरपाईचा पैसा येत नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.