नाशिक : आजकाल प्रत्येक गोष्ट डीजिटल होतेय. अगदी मंदिरातील पुजाही...कारण धावत्या जगात लोकांना वेळच नाहीये. सध्या पितृपक्षात आपल्या पितरांना श्राद्ध घालण्यासाठी मोठी गर्दी नाशिकमध्ये गोदाकाठावर होत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचवटीत देशभरातून लोक श्राद्ध घालण्यासाठी येत असतात. पिंडाला नैवेद्य दाखविण्याची परंपरा असते. या पिंडाला कावळा शिवल्यास श्राद्धकर्म पूर्ण होते.  मात्र कावळे कमी झाल्याने अनेक वेळेस भाविक तासान तास ताटकळतात. पितृ पंधरवड्यातही घरोघरी कावळ्याला नैवेद्य दाखवला जातो. मात्र अनेक ठिकाणी कावळा येतच नाही. कावळ्यांची संख्या कमी झालीये. 


त्यावरही काही बहाद्दरांनी उपाय शोधलाय. कावळा पकडून बळजबरीने त्याला घास भरवला जातोय. हा व्हिडीओ नाशिकमध्ये व्हायरल झाला आहे. कर्मकांडाचं विकृतीकरण कसे होत आहे याचा हा पुरावा आहे. 


नुकतेच पुण्यात हवामान शास्त्रज्ञ डॉ. मेधा खोले यांनी जात लपवून सोवळ्यात स्वयंपाक केल्यानं स्वंयपाकी महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरुन श्राद्ध कर्म आणि परंपरा यावर बराच वाद झाला होता. सोशल मीडियावर चर्चाही झाली. या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओही डोळ्यात अंजन घालणारा आहे.