अलिबाग : मान्सून अगदी तोंडावर आला आहे. राज्यात अवघ्या काही दिवसांनी मान्सूनचं आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात आगोटीची तयारी सुरु झाली आहे. आगोटी म्हणजे पावसाळ्यात लागणारा वस्तूसाठा. या आगोटीत घरात लागणाऱ्या रेशनचा समावेश असतो. आगोटीत सुक्या मासळीसह अन्नधान्य आणि दररोज लागणाऱ्या किराना सामानाचा साठा केला जातो. (crowds to poinad and hashivare weekly markets in alibag to buy food grains and groceries before rains thats called agoti)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आगोटीसाठी सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहक आठवडा बाजारात गर्दी करतायेत. अलिबाग आणि शेजारच्या तालुक्यातील बाजारपेठेत गावकरी एकच गर्दी करतायेत. यामुळे बाजारात सुक्या मासळीसह घरात लागणाऱ्या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.


पावसाळ्यात मासेमारी बंद असते. पावसाळ्यात अडीच ते तीन महिने सुखी मासळी मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ओल्या माशांना पर्याय म्हणून सुक्या मासळीचा साठा केला जातो. 


सुक्या मासळीसह तांदूळ-गहू, कडधान्ये, डाळी, साखर, मीठ-मसाले, पापड, कांदे-बटाट्यांचा सरपण म्हणून लाकडांचा साठा केला जातो.सोबतच जनावरांच्या सुक्या पेंडीचीही सोय करुन ठेवण्यात येते. 


या सर्व आगोटीसाठी अलिबाग जिल्ह्यातील पोयनाड आणि हाशिवरे, तसेच महाडमधील म्हसळा आणी दासगावच्या बाजारातील मासळीला खवैय्यांची अधिक पसंती आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सुकी मासळी देखील चांगलाच भाव खातेय.


आगोटी करण्यामागचं नक्की कारण काय?  (What is Agoti)


पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेतीची कामं सुरु असतात. जून महिन्यापासून अनेक सणांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते. तसेच पावसात दररोज बाजार करणं शक्य नसतं. अशावेळेस घरात कोणत्याही वस्तूची उणीव भासू नये, यासाठी आधीच सर्व सामनाचा साठा केला जातो.