राज्यात सीआरझेड मर्यादा कमी होणार
समुद्र किनारी टुमदार घर असावं असे अनेकांचे ड्रीम होमबाबतचे स्वप्न असते. पण समुद्र किनार्यावर बांधकाम वाढल्याने अनेक निसर्गाच्या चक्रामध्ये बिघाड निर्माण होत आहे.
नागपूर : समुद्र किनारी टुमदार घर असावं असे अनेकांचे ड्रीम होमबाबतचे स्वप्न असते. पण समुद्र किनार्यावर बांधकाम वाढल्याने अनेक निसर्गाच्या चक्रामध्ये बिघाड निर्माण होत आहे.
रामदास कदम यांची माहिती
राज्यात सीआरझेड मर्यादा कमी करणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली.
समुद्र किनारी बांधकामांचा सुळसुळाट वाढणार
५०० वरून २०० मीटर करण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या ७ दिवसात केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं पर्यावरणमंत्री यांनी सांगितलं. मात्र या निर्णयामुळे समुद्र किनारी बांधकामांचा सुळसुळाट वाढण्याची भीती व्यक्त होतेय.