CSMT ते ठाणे फक्त 40 मिनीटांत; लोकल ट्रेनसारखा जलद प्रवास ते पण बाय रोड
CSMT ते ठाणे अंतर 40 मिनीटांत पूर्ण करता येणार. विशेष म्हणजे हा प्रवास बाय रोड करता येणार आहे.
Elevated Eastern Freeway Extension from Chheda Nagar to Anand Nagar in Thane : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CSMT वरुन ठाणेला जायचं असेल तर सर्वात जलद मार्ग म्हणजे लोकल ट्रेनने प्रवास. मात्र, गर्दीमुळे लोकल ट्रेनचा प्रवास नकोसा वाटतो. मात्र, ठाण्याला जाण्यासाठी लोकल ट्रेनसारखा सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे ते पण बाय रोड. विशेष म्हणजे CSMT ते ठाणे फक्त 40 मिनीटांत हा प्रवास पूर्ण होणार आहे. ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार होत आहे. या प्रकल्पांतर्गत घाटकोपरच्या छेडानगर ते ठाणे दरम्यान उन्नत रस्ता तयार करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई ते ठाणे प्रवास अगदी सुपर फास्ट होणार आहे.
हे देखील वाचा.... मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छेडा नगर,घाटकोपर ते आनंद नगर,ठाणे या उन्नत पूर्व मुक्त विस्तार मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा 13.40 किमी. लांबीचा हा संपूर्ण उन्नत कॉरिडॉर आहे. या कॉरिडॉरच्या माध्यामातुन मुंबई आणि ठाणे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. हा एक महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय आहे.
हे देखील वाचा...भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात; महामार्गावर रेल्वे ब्रीज, ब्रीजवर फ्लायओव्हर त्यावर धावते मेट्रो
एकूण सहा मार्गिका असलेला उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाणे व मुंबई शहरातील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे दक्षिण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान वाहनांची ये-जा सुरळीत होईल. वाहतुक कोंडीच्या दृष्टीने विविध ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या रॅम्प आणि अत्याधुनिक टोल प्लाझामुळे हा प्रकल्प अधिक कार्यक्षम होईल. मुंबई आणि ठाणे शहरात रिंगरुटचे जाळे निर्माण करण्यास या पूर्वमुक्त मार्गाचा हा विस्तार उपयोगी ठरणार आहे.
असा वाचणार प्रवाशांचा वेळ
16.8 किमी लांबीचा ईस्टर्न फ्रीवे सीएसएमटीजवळ सुरू होतो. मानखुर्दजवळ फ्रीवे संपतो. एमएमआरडीएने 2014 मध्येच एलिव्हेटेड रोडची तयारी केली होती. येथून वाहने 20 मिनिटांत मानखुर्द किंवा घाटकोपरजवळ तसेच दक्षिण मुंबईला पोहोचतात. छेडानगर ते ठाण्यापर्यंतच्या फ्रीवेचे विस्तारीकरण झाल्यानंतर वाहने सुमारे 20 मिनिटांत ठाण्यात पोहोचू शकणार आहेत. म्हणजे एकूण 40 मिनीटांत CSMT ते ठाणे हा प्रवास पूर्ण होणार आहे.