भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात; महामार्गावर रेल्वे ब्रीज, ब्रीजवर फ्लायओव्हर त्यावर धावते मेट्रो
या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कामठीहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या उड्डाणपुलावरून थेट प्रवास करता येणार असल्याने त्याची वेळ व इंधनाचीही बचत होणार आहे.
Four-level Transportation Structure in Nagpur : भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात उभी राहिली आहे. नागपूरमधील गड्डीगोदाम येथे चार स्तरीय वाहतूक व्यवस्था पहायला मिळत आहे. एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक 5.67 किमी लांबीचा डबल डेकर उड्डानपुल आजपासून (शनिवार)सुरु होणाराय . या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे.