हयात नसलेल्या साहित्यिकास वाढदिवसाच्या शुभेच्छा
विद्यापीठाचे रखडलेले निकाल, शिक्षण क्षेत्रातील नवनवे घोटाळे अशा प्रश्नांना सामोरे जाताना शिक्षणमंत्री विनोद तावडेंची चांगलीच गोची झाली आहे.
पुणे : विद्यापीठाचे रखडलेले निकाल, शिक्षण क्षेत्रातील नवनवे घोटाळे अशा प्रश्नांना सामोरे जाताना शिक्षणमंत्री विनोद तावडेंची चांगलीच गोची झाली आहे.
त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. मागील वर्षी निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक रा.ग.जाधव यांना सांस्कृतिक मंत्री असलेल्या विनोद तावडे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र 'त्या' साहित्यिकांच्या घरच्या पत्त्यावर पोहोचले आहे. या पत्रावर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सही देखील केली आहे.
हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून सांस्कृतिक मंत्री असलेल्या तावडेंची खिल्ली उडविली जात आहे.
ज्येष्ठ साहित्यिक रा.ग. जाधव यांचं गेल्या वर्षी २७ मे २०१६ रोजी निधन झालं होतं. जाधव यांच्या निधनानंतर राज्य सरकारनं त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
यामध्ये विशेष म्हणजे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनीही त्यावेळी शोकसंदेशही दिला होता. त्यामुळे या अक्षम्य अशा चुकीमुळे सांस्कृतिक विभागाचे वाभाडे निघाले आहेत.