COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे मुख्य सचिव म्हणून अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमित मलिक निवृत्त होत असल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जवळपास ३० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनावर पकड असलेला आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाला योग्य दिशेने नेण्याची क्षमता असलेला अधिकारी मुख्य सचिव म्हणून मुख्यमंत्र्यांना हवा होता. डी. के. जैन यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या योजनेत चांगले काम केलेले आहे. तसेच अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचीही त्यांच्यावर मर्जी असल्याने त्यांनी जैन यांच्या नावाला पसंती दिली आहे. 


डी. के. जैन यांच्याविषयी...


राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील 1983 च्या बॅच मधील जेष्ठतेनुसार मेधा गाडगीळ, सुधीरकुमार श्रीवास्तव, डी. के. जैन, यु.पी.एस. मदान, संजीवनी कुट्टे आणि सुनील पोरवाल यांचा समावेश आहे. मात्र जेष्ठता यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २५ जानेवारी १९५९ साली जन्मलेले डी के जैन हे मूळ राजस्थानचे  आहे. २५ ऑगस्ट १९८३रोज़ी महाराष्ट्र राज्याच्या सेवेत रुजु झालेले जैन यांनी एम टेक मॅकेनिक आणि एम बी ए असे शिक्षण पूर्ण झाले आहे.