पुणे : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकही ग्राहक पुढे आलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थकीत कर्जाच्या वसुलीसाठी डीएसकेंच्या बालेवाडी इथली जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विक्रीला काढली. त्यासाठी बँकेने वृत्तपत्रातून जाहीरात देऊन इच्छुकांकडून निविदा मागवल्या होत्या. 


निविदा भरण्याची सात मार्च हि अंतिम मुदत होती. ८ मार्चला निविदा उघडल्या जाणार होत्या. मात्र, डीएसकेंची ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणीच पुढं आलेलं नाही. एकही निविदा न आल्याने बँकेनं निविदा प्रक्रियेला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 


बालेवाडी येथील मालमत्ता तारण ठेवून डीएसकेंनी सेंट्रल बँकेकडून कर्ज घेतले होते. सेंट्रल बँकेचे ७७ कोटी रुपये थकीत आहेत. तर या मालमत्तेची राखीव किंमत ६६ कोटी ३९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.