डी. एस. कुलकर्णींची मुंबई उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी
गुंतवणूकदारांचे पैसे थकवणारे वादग्रस्त पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या वकिलाची मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केलीय.
मुंबई : गुंतवणूकदारांचे पैसे थकवणारे वादग्रस्त पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या वकिलाची मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केलीय.
सहा मालमत्तांची यादी
गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी डीएसकेंच्या वकिलांनी सहा मालमत्तांची यादी दिली. मात्र त्या मालमत्ता बँकांकडे गहाण असून, आम्ही २५ टक्के रक्कम भरायला तयार आहोत, असं वकिलांनी सांगितलं.
कोर्ट म्हणजे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नाही
तेव्हा गेल्या तीन आठवड्यापासून तुम्ही फक्त बार्गेनिंग करताय? कोर्ट म्हणजे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नाही, असं न्यायालयानं सुनावलं. काय डिपॉझिट करताय, तेवढंच सांगा, अशा शब्दांत न्यायालयानं डीएसकेंच्या वकिलांना झापलं.
५० कोटी रुपये भरण्याची तयारी
तेव्हा येत्या सोमवारपर्यंत ५० कोटी रूपये भरण्याची तयारी डीएसकेंनी दर्शवली. पैसे भरले नाहीत तर शरण येईन, असंही डीएसकेंच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आलं.