डीएसकेंच्या गोठवलेल्या २७६ खात्यांमध्ये केवळ ४३ कोटी ९ लाख रूपये
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीएसकेंची तब्बल २७६ बॅंक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. डी एस कुलकर्णी यांच्या विविध कंपन्यांच्या नावांनी ही खाती आहेत.
पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीएसकेंची तब्बल २७६ बॅंक खाती पोलिसांनी गोठवली आहेत. डी एस कुलकर्णी यांच्या विविध कंपन्यांच्या नावांनी ही खाती आहेत.
विशेष म्हणजे या सगळ्या खात्यांमध्ये मिळून केवळ ४३ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे डीएसके यांनी त्यांचा पैसा कुठे ठेवला याचा तपास पोलिस करत आहेत. डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
डीएसकेंच्या विरोधात आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींवरुन त्यांनी ठेवीदारांची सुमारे ३०० कोटींपेक्षा जास्तची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय.