डीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर आज निकाल
बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झालाय. याप्रकरणी आज निकाल सुनावला जाणार आहे.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झालाय. याप्रकरणी आज निकाल सुनावला जाणार आहे. अटक होऊन साठ दिवस उलटले तरी आरोपपत्र दाखल झालेलं नाही. त्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद डीएस कुलकर्णींच्या वकीलांनी केलाय. तर डी एस कुलकर्णींवर कलम 409 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
या कलमांतर्गत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदत असते, असा सरकारी वकीलांचा युक्तीवाद आहे. डीएसकेंना जामीन मिळतो का याकडे लक्ष लागलंय.