पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार मधला प्रसिद्ध दाभोसा धबधबा मुसळधार पावसामुळे जोरात कोसळू लागला आहे. यामुळे धबधब्याच्या खाली उत्तरण्याचा रस्ता ही खचला आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकाना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर वाघोबा घाटातील सौदर्य स्थळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पावसामुळे पूरस्थिती असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षा येथे पाहायला मिळत नाही. त्यामुळे धबधबा असुरक्षित असून पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर मध्ये रातभर पावसाची संततधार सुरूच असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालघर मधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय नालासोपारा येथे पाणी भरल्यामुळे काल सारखीच परिस्थिती निर्माण झाली असून पश्चिम रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने सुरू आहेत. तसेच डहाणू उपनगरीय सेवा सुद्धा उशिराने सुरू आहेत. दरम्यान पालघर आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.