COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : अध्यात्मिक गुरु आणि साधु वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे.पी.वासवानी यांचं पुण्यात ९९व्या वर्षी निधन झालय. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील साधु वासवानी मिशनमध्ये त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. प्रेम आणि अहिंसेच्या मार्गानं चालण्याची शिकवण त्यांनी जगाला दिली. जगभर त्यांचे अनुयायी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. 


भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित अध्यात्मिक गुरुंमध्ये दादा वासवानी एक होते. त्यांच्या निधनानं देश-परदेशातील त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.


२ ऑगस्ट १९१८ रोजी हैदराबाद-सिंधमध्ये दादा वासवानी यांचा जन्म झाला होता. त्यांनी शिक्षण सोडून संत आणि आपले काका गुरु साधु वासवानी यांच्या प्रति जीवन समर्पित केलं होतं.