ठाणे : दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी चार हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह शीघ्र कृती दल, राज्य राजीव दलाच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गस्त घालणाऱ्या पोलिसांनाही तैनात करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या छेडछाडीसारखे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचं विशेष पथकही तैनात करण्यात आलंय. सर्व हालचालींवर सीसीटीव्हीचीही नजर असणार आहे. तसंच दहीहंडी आयोजकांनाही स्वयंसेवक तैनात करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. गरज भासल्यास ड्रोनचाही वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 


शाळांना सुटी जाहीर


दरम्यान, उद्या दहिहंडी उत्सव असल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सुटी जाहीर करण्यात आलीये. खरंतर शहरात दहिहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे दरवर्षी सुटी दिली जाते. मात्र यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं सुटीबाबत आदेश काढलेत. 


शिवसेनेने दहिहंडी उत्सव केला रद्द 


यंदा पुराच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेनेनं दहिहंडी उत्सव रद्द केलाय. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जल्लोषाला फाटा देत प्रातिनिधिक स्वरुपात हंडी फोडण्यात येणार आहे. यातून वाचलेली खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात येणार आहे.