महाराष्ट्र दिनाचं भाषण करताय? 'या' 10 मुद्द्यांचा नक्की करा समावेश

Maharashtra Din Speech: महाराष्ट्र दिनी अनेक शाळा, सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांना भाषण करायचे असते. त्यासाठी महाराष्ट्राविषयीच्या पुढील मुद्द्यांची तुम्हाला मदत होऊ शकते. 

| May 01, 2024, 08:51 AM IST

Maharashtra Din Speech: महाराष्ट्र दिनी अनेक शाळा, सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांना भाषण करायचे असते. त्यासाठी महाराष्ट्राविषयीच्या पुढील मुद्द्यांची तुम्हाला मदत होऊ शकते. 

1/10

महाराष्ट्र दिनाचं भाषण करताय? 'या' 10 मुद्द्यांचा नक्की करा समावेश

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

Maharashtra Din Speech:1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यामुळं दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य भरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. याला कामगार दिन असेही म्हणतात. 

2/10

संघर्षाचा वारसा

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मोठ्या संघर्षाचा वारसा आहे. यासाठी अनेक भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करलंय. यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली.  

3/10

विकास

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

विकासाच्या बाबतीत अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर नागपूर ही राज्याची उपराजधानी ओळखली जाते. 

4/10

क्षेत्रफळ

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3 लाख 7 हजार 713 चौ. किमी इतके आहे.  क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.

5/10

सीमा

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

महाराष्ट्राच्या सीमेला लागून छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, दमण-दीव ही राज्ये लागून आहेत.

6/10

भौगोलिक

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

महाराष्ट्राला मोठी भूमी लाभली आहे. भौगोलिक दृष्टीने पाहायला गेलं तर राज्याची दक्षिणोत्तर लांबी 720 किमी तर पूर्व-पश्चिम लांबी 800 किमी एवढी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

7/10

लोकसंख्या

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

2011च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 330 एवढी आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ, 78 विधानपरिषद मतदारसंघ, 48 लोकसभा मतदारसंघ, 19 राज्यसभा मतदारसंघ आहेत. सध्या राज्यात लोकसभा निवडणूक सुरु आहे.

8/10

6 प्रशासकीय विभाग

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

महाराष्ट्र कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती औरंगाबाद हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची 1664 मी. इतकी आहे.

9/10

प्रमुख नद्या

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

गोदावरी, कृष्णा, सावित्री, नर्मदा, पंचगंगा, कोयना ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत. आंबोली जि.सिंधुदुर्ग आणि कोकणात राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो. बुलढाणा जिल्हातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे.

10/10

गडकिल्ले

Maharashtra Din Speech Pointers For School Students Marathi News

छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे गडकिल्ले, अजिंठा-वेरुळ लेणी, कास पठार, गेट वे ऑफ इंडिया, विविध व्याघ्रप्रकल्प, अष्टविनायक, ज्योतिर्लिंगे, शक्तीपीठं इत्यादी अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहे.