Pune News : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात (Dhule) बेवारस आणि खंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते. ही बातमी गौतमीपर्यंत पोहोचल्यानंतर तिने वडिलांना माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आता त्यांचं निधन (Gautami Patil father Passed away) झाल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी त्यांच्या खिशात एक कार्ड सापडलं. त्यावरून ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचं समजलं. त्यानंतर गौतमीला ही माहिती देण्यात आली. आपले वडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून प्रकृती गंभीर असल्याचे कळताच गौतमी हिने धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्याशी संपर्क साधला.


जयश्री अहिरराव यांच्या मदतीने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आलं. वडिलांचा उपचार स्वखर्चाने करणार असल्याचं गौतमीने सांगितलं होतं. गौतमीची मावशी सुरेखा पाटील यांनी गौतमीचं कौतुक करत मुलीचे कर्तव्य बजावत असल्याचं सांगितलं होतं. गौतमी ही लहानपणापासूनच तिच्या मामांकडे वाढली आहे. मात्र वडील म्हणून रवींद्र पाटील यांनी कोणतेही कर्तव्य बजावलेले नाही. तरी देखील ती आता वडिलांसाठी धावून आल्याने तिचं सध्या कौतुक होताना दिसतंय.


अंत्यविधीला गौतमी उपस्थित


गौतमीच्या वडिलांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झालं असल्याचं समोर आलं आहे. जेव्हा ते बेवारस सापडले तेव्हा दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न नव्हतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. बरं झाल्या नंतर गौतमी ही वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार होती, अशी माहिती समोर आली आहे. आज त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी नृत्यांगना गौतमी पाटील व तिची आई उपस्थित होत्या व इतर मान्यवरही उपस्थित होते.


'या' एका कारणामुळे Gautami Patil नं ठरवलं लावणी डान्सर म्हणून करिअर करायचं...


दरम्यान, रवींद्र पाटील यांना दारूचं व्यस्न होतं. त्यामुळे गौतमीची आई गौतमीला पुण्यात घेऊन आली. त्यानंतर तिने डान्स शिकला आणि काही वर्षातच ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्याआधी तिने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अशातच आता गौतमीच्या पित्याचं छत्र हरपल्याचं पहायला मिळतंय.