कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक सखल भागात पुराचे पाणी घुसू लागले आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट असून सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 46 फूट 1 इंच इतकी आहे. पंचगंगा नदीने अवघ्या तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसानंतर धोका पातळी ओलांडल्याने अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जिल्ह्यातील इतरही नद्या धोका पातळीवरून वाहत असून अनेक ठिकाणी वाहन धारक जीव धोक्यात घालून याच पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. जिल्ह्यातील धरणे अद्यापि पूर्ण क्षमतेने भरली नसल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नाही,  त्यामुळे काही अंशी नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. अस असलं तरी जोरदार आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे ही धरणं लवकरच शंभर टक्के भरून त्यानंतर या धरणातून विसर्ग सुरू होईल अस दिसतंय.. त्यामुळे सर्वांचे लक्ष आहे जिल्ह्यातील धरणांच्या सोबतच कर्नाटक मधील हिप्परगी आणि अलमट्टी या धरणातील विसर्गाकडे लागून राहील आहे.


दरम्यान सखल भागातील नागरिकांचे प्रशासनाच्या वतीन युद्धपातळीवर स्थलांतर करण्यात येत आहे. एकीकडं नद्यांना पूर आल्यामुळे अनेक पुलावर दोन ते तीन फूट इतक पाणी आहे. त्यामुळे या पुलावरून वाट काढणं जोखमीच असताना देखील कोल्हापूर जिल्ह्यातील नागरदळे गावाजवळील  कडलगे खुर्द इथल्या पाण्यातून अभिषेक संभाजी पाटील आणि त्याचा सहकारी  वाट काढत होते. पण पाण्याला मोठा वेग असल्यामुळे अभिषेक पाटील हा या पाण्यातून वाहून गेला.


अभिषेक हा इअर इंडिया मध्ये नोकरीला होता .तो सुट्टीवर गावी आला असता ही दुर्घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बेटिंग सुरू असल्यामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलाव देखील पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे रंकाळ्याच्या कठड्यावरून जोरदार पाणी वाहत आहे. याच पाण्याचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरकर  रंकाळा तलावावर मोठी गर्दी केली. यावेळी मात्र कोल्हापूरकरांना कोरोनाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं.