कोल्हापूर : अंबाबाईच्या (Ambabai) छतावर १०० ट्रक मातीचे ओझे झाले आहे. त्यामुळे मंदिराला (Ambabai temple) धोका निर्माण झाला आहे. मंदिराच्या छतावर एक हजार टन कोबा करण्यात आला आहे. हा कोबा न काढल्यास मंदिराच्या छताला धोका निर्माण झाला आहे. स्ट्क्चरल ऑडिटमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. १६०० वर्ष जुन्या मंदिराचे प्रथमच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. ज्या ज्या वेळी अंबाबाई मंदिराच्या छताला गळती लागली, त्या त्या वेळी मंदिराच्या छतावर डागडूजी करून छतावर मोठ्या प्रमाणात कोबा टाकल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच (Ambabai temple at Kolhapur) इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. मंदिराच्या छताच्या स्ट्रक्चरल ऑडिटच काम नुकताच पूर्ण झाले आहे. या ऑडिटमध्ये अनेक गंभीरबाबी समोर आल्याचा दावा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत मध्ये केला आहे. या ऑडिटच्या अहवालानुसार मंदिराच्या छतावर तब्बल एक हजार टन कोबा असल्याचे उघड झाले आहे. हा बोजा मंदिराच्या मूळ ढाच्याला धोकादायक असल्याने तो तात्काळ हटविण्याची गरज सुद्धा जाधव यांनी व्यक्त केली आहे.


साडेतीन शक्तिपीठांपैकी महत्वाचे पीठ असणारे अंबाबाई मंदिर. १६०० वर्षांपूर्वीच्या या मंदिराची गळती काढण्यासाठी वेळोवेळो डागडूजी करण्यात आली. पण हे करत असताना मंदिराच्या छतावर किती टन माती, किती टन कोबा केला गेला याचा अंदाज कोणालाच आला नाही. एव्हडे होवून देखील अंबाबाई मंदिरात अजूनही मोठ्याप्रमाणात गळती असल्याचे दिसून आले आहे.


या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संपूर्ण मंदिराचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मंदिराच्या छतात स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले. या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. तब्बल १०० ट्रक निघेल इतका कोबा म्हणजेच एक हजार टन माती मंदिराच्या छतावर असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आले आहे.



अंबाबाई मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये नवनवीन माहिती समोर येत आहेत. शिवाय अंबाबाई मंदिर आवारातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खननामध्ये देखील अनेक महत्त्वपूर्ण बाबी उजेडात येत आहेत. १६०० वर्षांनंतर अंबाबाई मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट होत आहे. ही चांगली बाब आहे. पण ऑडिट मध्ये सुचविल्या मुद्द्यांवर तात्काळ कारवाई होणे गरजेचं आहे. अन्यथा मुदिराच्या मूळ ढाच्याला धक्का लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.