मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे निसर्ग आणि पावसाशी संबंधीत अनेक व्हिडीओ येथे तुम्ही पाहिले असेल. हे व्हिडीओ इतके मनमोहक असतात की, ते आपल्याला तेथे जाण्यासाठी आणि बाहेर फिरण्यासाठी उत्सफुर्त करतात. तसेच हे दृश्य पाहातच राहावंसं वाटतं. यामध्ये अनेक तरुण मंडळी फिरताना, हिंडताना आणि मजा करताना दिसतात. सध्या याच संबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतु हा व्हिडीओ काहीसा वेळा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत तुम्हाला पाऊस, हिरवेगार डोंगर दिसत असले तरी देखील यामध्ये असलेले तरुण हे या ठिकाणी एका गायीच्या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कसं डोंगराच्या अगदी टोकावर एका दोरीला धरुन अनेक तरुण उभे आहेत. हे तरुण निसरड्या रसत्यावर आपल्या तरुणाची पर्वा न करता डोंगर आणि दरीमध्ये अडकलेल्या गायीच्या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


व्हिडिओमध्ये पुढे एक मुलगा समोर उभा असल्याचे दिसून येते. तो सर्वात धोकादायक उतारावर आहे. हा उतार पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. मग विचार करा तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीसाठी ते किती धोकादायक असू शकतं.


खरंतर या तरुणांनी पुढे उभ्या असलेल्या व्यक्तीच्या कमरेला दोरी बांधली होत, त्याचवेळी वासराच्या पायाला दुसरी दोरी बांधली, ज्यानंतर बाकीचे लोक रांगेत उभे राहून त्या वासराला वर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर या तरुणांना वासराला तेथून बाहेर काढण्यात यश आले आहे.


तसं पाहायला गेलं तर सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात माणसाला आपल्या जवळील माणसाला मदत करण्यासाठी वेळ नसतो. परंतु असे असले तरी. हे लोक एका प्राण्याच्या पिल्ला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावरील लोकांच्या मनात घर करत आहे.


म्हणूनच लोकं या व्हडिओला शेअर, लाईक आणि कमेंट्स करत आहेत. सोशल मीडिया यूजर्स या तरुणांचे कौतुक देखील करत आहेत.



३-४ दिवस अडकून पडला होता वासरु


व्हायरल झालेला व्हिडीओ महाराष्ट्रातील पनवेलचा आहे ज्यात काही स्थानिक तरुण अत्यंत धोकादायक ठिकाणाहून वासराला वाचवताना दिसत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, येथे एक वासरु सुमारे ३-४ दिवस खोऱ्यात अडकला आहे. तो तिथून बाहेर पडू शकला नाही. त्यानंतर तो तेथे अडकला असल्याची माहिती तेथील तरुणांना समजताच त्यांनी तेथून वासराला बाहेर काढण्याचा विचार केला.