दशक्रिया चित्रपटाला विरोध म्हणून विधी बंद
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आज औरंगाबादमध्ये विरोधकांनी प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात शो बंद पाडला आहे.
औरंगाबाद : दशक्रिया या मराठी चित्रपटाला औरंगाबाद जिल्ह्यात मोठा विरोध होतोय. या चित्रपटाला विरोध म्हणून आज पैठण येथील पुरोहितांनी सर्व विधी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुरोहितांनी या चित्रपटाला विरोध केल्यानं पैठणमधील सर्व विधी सकाळपासून थांबवण्यात आले होते.
कुठलेही विधी बंद नाहीत- आनंद दवे
परिणामी बाहेरील जिल्ह्यातून पैठण येथे विधीसाठी आलेल्याचा खोळंबा झाला होता. दरम्यान आनंद दवे यांनी मात्र अशाप्रकारे कुठलेही विधी बंद नसल्याचा खुलासा केला आहे.
प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात शो बंद पाडला
दुसरीकडे औरंगाबाद शहरात दशक्रिया चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आज औरंगाबादमध्ये विरोधकांनी प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात शो बंद पाडला आहे. बाह्मण संघाच्या आंदोलकांनी आज दुपारी मॉलच्या बाहेर आंदोलन केलंय. आंदोलनानंतर आजचे या मॉलमध्ये होणारे शोज रद्द करण्यात आले आहेत.