मुंबई: स्वातंत्र्य दिनाचा उत्साह एकीकडे साजरा होत असताना सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद विधान केल्यानं मोठी खळबळ उडाली. सामान्य प्रशासन राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणेंची जीभ घसरली. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहून भरणेंना माफी मागावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर महापालिकेच्या माझी वसुंधरा कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमानास्पद उल्लेख केला. 'मुख्यमंत्री जाऊ द्या,मरू द्या... आधी आपण आपलं करू' असं ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले. भरणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे सोलापूर संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी त्यांना सज्जड दम भरला. 



शिवसेनेचे सोलापूर संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी भरणे मामा औकादीत राहा, असं सावंत यांनी बजावलं. दरम्यान, या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकला. राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद शब्द काढल्यानंतर पुण्यात शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे.