बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS)च्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत दत्तात्रय होसबळे यांची संघाच्या सरकार्यवाहकपदी निवड  करण्यात आली आहे. दत्तात्रय होसबळे हे भैयाजी जोशी यांची जागा घेतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरएसएसचे अखिल  भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी म्हटले की, 'भैयाजी जोशी यांनी  इच्छा व्यक्त केली होती की, ते गेल्या 12 वर्षापासून सांभाळत असलेल्या या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छिता'. 


दत्तात्रय यांची तीन वर्षासाठी सर्वसंमतीने निव़ड करण्यात आली आहे. संघात आता त्यांचे सरसंघचालकांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


कोण आहेत दत्तात्रय होसबळे


  • दत्तात्रय होसबळे  66 वर्षीय आहेत. 

  • त्यांचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला आहे.

  • 1968 साली ते आरएसएसमध्ये सहभागी झाले होते

  • आणिबाणीच्या काळात त्यांना अटकही झाली होती.   

  • आसाममधील युथ डेव्हलपमेंट सेंटर विकसित करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.