आई शेर, मुलगी सव्वाशेर; शेवटी खोटं बाहेर आलंच...
यासाठी कारण ठरली 3 महिन्यांपूर्वीची मोबाईलमध्ये सापडलेली एक ऑडिओ क्लिप (Audio Clip).
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी (Bramhapuri) शहरात पत्नीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या 66 वर्षीय पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केला ज्याचं गूढ 3 महिन्यांपूर्वीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगने उलगडले. आईला वापरण्यासाठी दिलेल्या मोबाईलमध्ये (Mobile Audio) ऑडिओ आरोपींची ऑडिओ क्लिप सापडल्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर केली आरोपी पत्नी आणि प्रियकराला (Boyfriend) अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील 66 वर्षीय सेवानिवृत्त वनविभाग लिपिकाच्या हत्येप्रकरणी त्याची 50 वर्षीय पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे आणि यासाठी कारण ठरली 3 महिन्यांपूर्वीची मोबाईलमध्ये सापडलेली एक ऑडिओ क्लिप. (Audio Clip)
6 ऑगस्ट 2022 रोजी ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरात राहणाऱ्या श्याम रामटेके (Father) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी रंजना यांनी आपल्या दोन्ही मुलींना वडील हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावले असा निरोप दिला. आईने सांगितलेली बाब सत्य मानून नागपुरात असलेल्या दोन्ही मुली परत आल्या. रीतसर अंत्यविधी झाला.
हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
यानंतर आई एकटीच घरी राहते यावरून लहान मुलगी ब्रह्मपुरी (Daugther) येथे राहण्यास आली. मात्र तिला आईच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले. रंजना रामटेके (Ramteke) यांचे आंबेडकर चौकात छोटे जनरल दुकान (Shop) आहे. या दुकानालगतच मुकेश त्रिवेदी यांचे भाजीपाला व बांगडी विक्रीचे दुकान आहे. मुकेश त्रिवेदी यांचे वारंवार घरी येणे मुलींना खटकू लागल्यावर दोघींनी आई व मुकेश त्रिवेदी दोघांनाही समाजात बदनाम होण्याबाबत समज (Mother - Daugther) दिली होती.
हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
आई एकटीच राहत असल्याच्या काळात मुलीने तिला आपला स्मार्टफोन (Smartphone) देऊ केला होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर तिने हा मोबाईल (Mobile) परत स्वतःकडे घेतला. त्यावेळेस तिला 6 ऑगस्ट रोजी पहाटेचे हे दहा मिनिटांचे ऑडिओ रेकॉर्डिंग (Audio Recording) सापडले. त्यावरून मुकेश त्रिवेदी (Mukesh Trivedi) या प्रियकराच्या मदतीने कट करून प्रथम विष पाजत व नंतर हातपाय बांधून आईने तोंडावर उशी दाबून वडिलांचा खून केल्याची माहिती मिळाली. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रंजना रामटेके व मुकेश त्रिवेदी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यात सर्व सत्य पुढे आले.