मुंबई : ट्वीटर वरुन एकमेकांनवर राजकीय आरोप प्रत्योरोप करतांना आपण आजपर्यंत राजकीय नेत्यांनाच बघितलं असेल. मात्र या आरोप प्रत्यारोपात राजकारण्याच्या मुलींनीही उडी घेतल्याच महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे. राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयु देशमुख यांनी पडळकरांना टोला लगवल्याचं ट्विट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकारणातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. थोरात यांनी पडळकरांना काही उत्तर देण्यापूर्वीच त्यांची कन्या अमृतवाहिनी कृषी व शैक्षणिक संस्थेच्या संचालक शरयू देशमुख यांनी उत्तर दिले आहे. 



'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. अशा शब्दांत शरयू देशमुख यांनी पडळकरांना टोला लगावला आहे.