नवी दिल्ली : २९ ऑगस्ट रोजी आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्प्रेसचे इंजिन व नऊ डबे घसरले.  यावेळी लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावल्यामुळे होणारा भीषण अपघात टळला होता. प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या दोन्ही ड्रायव्हरचा रेल्वे बोर्डाने शनिवारी सत्कार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे बार्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी दुरांतोचे लोको पायलट वीरेंद्र सिंग (५२) आणि सह लोको पायलट अभयकुमार पाल यांना अनुक्रमे दहा आणि पाच हजारांचे रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्रक देऊन आज गौरविले.  हे दोघेही मध्य रेल्वेचे कर्मचारी आहेत. या दोघांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता व प्रसंगावधान राखून ते खरे ‘रेल्वेमन’ असल्याची प्रचिती दिली, असे लोहाणी म्हणाले.


प्रशस्तिपत्रातील कौतुकास्पद शब्द 


मोठे वळण व मुसळधार पाऊस, यामुळे रुळांवर दरड कोसळल्याचे ऐनवेळी लक्षात येताच या दोघांनी इमर्जन्सी ब्रेक लावले.
परिणामी, रुळांवर कोसळलेल्या दगड-मातीवर गाडी येऊन आपटली, तेव्हा तिचा वेग खूपच कमी झाला होता. अचानक ब्रेकमुळे इंजिन व नऊ डबे घसरले, पण मोठा अनर्थ टळला. 
आणीबाणीच्या वेळीही कुमार व पाल यांनी मन शांत ठेवून नियंत्रण कक्षाशी लगेच संपर्क साधला 
आणि अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवरील वीजपुरवठा तत्काळ बंद करायला लावला. त्यामुळेही अपघाताचा संभाव्य धोका कमी झाला.