Akola Local News : अनेक स्ठथीचे आजाक हे दूषीत पाण्यामुळे होतात. यामुळे पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यामुळे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वेळोवेळी साफ करणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी याकडे दुर्लक्ष केले जाते. असाच धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील एका गावात  पिण्याच्या पाण्यातून दुर्गंधी येत असल्याने गावातील तरुणांनीच पाण्याची टाकी साफ केली. मात्र, जे दिसलं ते पाहून त्यांना मोठा धक्का बसला. 


टाकी मधील पाण्याची अतिशय वाईट दुर्गंध येत असल्याने ग्रामस्थ संतापले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर जवळील दूधलम गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गावातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पीत होते. गेल्या पाच वर्षांपासून टाकीची साफसफाई केलीच नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाण्याच्या टाकीमधील पाण्यातून अतिशय वाईट दुर्गंध येत होती. ग्रामपंचायत सदस्यांनी ही बाब सरपंचाच्या लक्षात आणून दिल्यावरसुद्धा सरपंचाने त्याकडे दुर्लक्ष केले.


पाण्याच्या पाण्याच्या टाकीत सापडले साप


संरपंचाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. यामुळे गावातीलच काही तरुणांनी टाकीवर चडून या टाकीची स्वछता केलीय. या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क दोन मृत साप आढळल्याने नागरिकांना धक्काच बसलाय. या प्रकारामुळे दूधलम ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 


विहीरीत विषारी औषध टाकून पाणी दूषित केले


मनमाडजवळच्या साकोरा गावात विहीरीत विषारी औषध टाकून पाणी दूषित केल्याची घटना उघडकीस आलीय. शांताराम बोरसे यांच्या विहिरीत पाणी होतं. या पाण्यात विषारी औषध टाकून ते दूषित करण्यात आलंय. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.