प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे नेमकं काय असतं ते दोखवून देणारा धक्कादायक प्रकार मीरारोड (Miraroad) परीसरात घडला आहे. रुग्णवाहिकेतून मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांची चोरी झाली आहे. यामुळे महिलेच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे (Crime news). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरारोडच्या कनक्किया परिसरात राहणाऱ्या रहीम मौला शेख यांच्या आईचा घरातच दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. त्यांनी भाईंदर येथील लाईफ केअर रुग्णालयातील डॉक्टरांना याची माहिती देऊन डॉक्टरांना घरी बोलावले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 


मात्र, तरी देखील पुढील तपासणीसाठी शेख यांच्या आईला रुग्णवाहिकेने भाईंदर पूर्वेच्या लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये नेण्यात येत होते. यावेळी रुग्णवाहिकेतील एका कर्मचाऱ्याने शेख यांच्या मृत आईच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरल्या. यांनचर त्यांनी या बांगड्या विरार मधील एका सोनाराकडे गहाण ठेवून पैसे घेतले होते.


शेख यांच्या आईला पुढील विधीसाठी घरी आणल्यानंतर त्यांना बांगड्या चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी नवघर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत रुग्णवाहिका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


13 बाईक चोरल्या; अल्पवयीन मुलाचा कारनामा


डोंबिवली पूर्व परिसरातील सोसायट्यांमधून सायकल चोरीच सत्र सुरू झालं होतं. या सायकल कोण चोरी करतंय याचा थांगपत्ता लागत नव्हता. डोंबिवली पोलिसांना या सायकल चोरांना सीसीटीव्ही मदतीने ताब्यात घेतले आहे. यानंतर सायकल चोरी उघड झाली. यातील एक जण अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून तब्बल 13 सायकल जप्त करण्यात डोंबिवली पोलिसांना यश आले आहे. डोंबिवलीच्या नंददीप रुद्रकुटी, जय मधू मिलन गणेश प्रतिभा आणि विवेक या सोसायट्यांमधून सायकल चोरी झाली होत्या. डोंबिवली पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी ज्या रस्त्यावरून येत होते, त्यावर पाळत ठेवून संशयित असलेला दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील जसमेरसिंग सैनी आणि एका अल्पवयीन मुलाने सायकल चोरी करत असल्याची कबुली दिली.अल्पवयीन आरोपीला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिल्या असून दुसऱ्या आरोपीला न्यायालयात हजर केला जाणार आहे.