चंद्रपूर : एका कारला लागलेल्या आगीत होरपळून एका अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची हृद्यद्रावक घटना घडली आहे. भद्रावती येथील पॉवर ग्रीड कंपनीच्या कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेले धर्मेंद्र खोब्रागडे  पॉवर ग्रीड मध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते.


पार्कींगमधून कार काढतांना अचानक आग लागली आणि आगीचा भडका उडाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा तपास सुरु आहे.