pune news : मृत्यू कुणाला कधी कुठे कसा गाठेल याचा काही नेम नाही. चहा पिता पिता एका तरुणाला मृत्यूने गाठले आहे. पुण्यातील चहा कट्ट्यावर विचित्र घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, चहा कट्यावर चहा पिण्यासाठी येणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे. झाडाची वाढलेली फांदी डोक्यावर पडून कसबा पेठेत राहणारा अभिजीत गुंड याचा जागीच मृत्यू झाला आहे. ओंकारेश्वरजवळच्या चहा कट्ट्यावर रविवारी सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली. 


धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणचा उंबराच झाड धोकादायक असल्याची तक्रार गणेश पाचरकर नावाच्या कार्यकर्त्यांन जुलै मध्येच केली होती. मात्र तिची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. उद्यान विभागाकडून धोकादायक झाडाच्या फांद्या वेळ काढल्या गेल्या असत्या तर अभिजीत चा जीव गेला नसता. अभिजीतच्या मृत्यूला महापालिका प्रशासनातील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मनसे कडून करण्यात येत आहे.


महापालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला


केडीएमसीचे वाहनचालक विनोद लकेश्री यांच्यावर धारदार शस्त्राने एका अनोळखी व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रात्री पावणे नऊच्या सुमारास केडीएमसी विभागीय कार्यालया जवळील शहीद भगतसिंग रोडवर घडली. मनपा विभागीय कार्यालयाच्या नजीक घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. लकेश्री यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना एमआयडीसीतील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.


टोळक्याने केलेल्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू 


आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून एका टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची, धक्कादायक घटना घडलीय. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आलंय.  दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून मृत अल्पवयीन मुलाचे अपहरण केले होते. त्यानंतर या टोळक्याने मुलाला विल्होळी जवळील एका स्टोन खडी क्रशर जवळ उचलून नेले आणि त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मार लागल्याने राजा सिंग याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याचे लक्षात येतात टोळक्याने त्याचा मृतदेह राजूर बहुला या परिसरातील एका निर्जन भागात नेऊन टाकला. दरम्यान राजा सिंग हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती. यावरून तपास केला असता, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहानिशा केली असता, अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.