कोल्हापूर: नजरचूकीने केलेले कृत्य एका तरूणाच्या जीवावर बेतले आहे. कोल्हापूरातील आरडेवाडी (ता. करवीर) येथील कृष्णात पाचाकटे या तरूणाने खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केले. त्यामुळे विषबाधा होऊन या तरूणास अवघ्या १४व्या वर्षीच आपले प्राण गमवावे लागले.


नजरचुकीने तणनाशकचे प्राशन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटेबाबत प्राप्त माहिती अशी की, जयदीप याला काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत होता. बुधवारी सकाळीही त्याला खोकल्याची उबळ आली. हा त्रास नेहमीपेक्षा काहीसा अधिक होता. त्यामुळे त्याने खोकल्याचे औषध प्यायला घेतले. पण, खोकल्याचे औषध घेताना नजरचुकीने त्याने तणनाशकच प्राशन केले. या प्रकारानंतर काही वेळाने त्याला अचानक प्रचंड त्रास होऊ लागला. त्याला होणारा त्रास पाहून घरचेही भांबाऊन गेले. त्यामुळे घरच्यांनी काळजीपूर्वक पाहिले असता, त्याने प्राशन केलेले औषध हे खोकल्याचे नव्हते. तर, ते तणनाशक होते हे त्यांच्या ध्यानात आले. त्यानंतर घरच्यांनी त्याला कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालयात तातडीने दाखल केले.


मध्यरात्रीच्या सुमारास जयदीपचा मृत्यू


दरम्यान, डॉक्टरांनी औषधोपचार करून जयदीपचे प्राण वाचविण्या अथक प्रयत्न केला. पण, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जयदीपचा मृत्यू झाला. तो श्री स्वयंभू हायस्कूलचा इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. धक्कादायक अशा या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.