खेळताना वाद, अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची केली हत्या
देवरी तालुक्यात खेळताना झालेल्या वादमुळे अल्पवयीन मुलानं दुस-या अल्पवयीन मुलाची हत्या केली. चिचगडमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.
गोंदिया : देवरी तालुक्यात खेळताना झालेल्या वादमुळे अल्पवयीन मुलानं दुस-या अल्पवयीन मुलाची हत्या केली. चिचगडमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.
गळा आवळला
१२ वर्षीय पुष्कर परिहारची अल्पवयीन मुलानं हत्या केली. खेळताना त्यांच्यात वाद झाला तो इतका विकोपाला गेला की आरोपीनं पुष्करचा मागून गळा आवळला. काही क्षणातच पुष्कर बेशुद्ध झाला.
अल्पवयीन मुलाला अटक
त्यानंतर पुष्करला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चिचगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.