अमरावती : शेतातील उत्पादनामध्ये झालेली घट आणि पुन्हा या वर्षी दुबार पेरणीच संकट अशा संकटात सापडलेल्या आजारी कर्जबाजारी  शेतकऱ्यांने आत्महत्या केली.  राजू रामचंद्र बुरघाटे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पत्नीने आजारांवरील उपचारांसाठी कर्ज घेतले होते. ते कसे फेडायच्या या विवंचनेतून त्यांने विहीर झोकून आत्महत्या केली. ही घटना ढाकुलगाव येथे घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील तीन वर्षांपासून राजू या शेतकरी कर्करोगाने ग्रस्त आहे. तसेच वारंवार होणारी नापिकी. यावर्षी आलेले दुबार पेरणीचे संकट आणि त्यात अजारावर उपचारासाठी पत्नीने काढलेल कर्ज, यामुळे हा शेतकरी कर्ज कसे फेडायचे या चिंतेत होता. 



राजू या शेतकऱ्याकडे एकूण एक एकर शेती आहे. या शेतीच्या भरवशावर कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने ते मोलमजुरी करत. दरम्यान तीन वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग या आजाराचे निदान झाले. मागील तीन वर्षात त्यांच्या आजारावर जवळपास तीन लाख रुपये खर्च झाले. अशातच मागील वर्षी ही शेतातील उत्पादन मध्ये झालेली घट आणि या वर्षी दुबार पेरणीच संकट त्यामुळे कर्ज आता फेडावे तरी कसे, या विवंचनेत राजू यांनी आज सकाळी शेतातील विहरीत उडी मारुन आत्महत्या केली. 


त्यांच्या मागे  पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दोन्ही मुलांची शिक्षण बाकी आहे. घरचा कर्ता पुरुषच गेल्याने बुरघाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्हाला सरकार मे काही मदत करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबाने केली आहे.