अमरावती :    मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी दीपाली चव्हाण यांनी डोक्यात गोळ्या झाडून त्यांचं जीवन संपवलं होतं. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटलं होतं. या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली आहे. तर आज माजी क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
 
 दीपाली यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांनी पत्रात आपल्या वरिष्ठांनी त्रास दिल्याचा उल्लेख केला होता. तसेच, दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळ्या झाडण्यापूर्वी पतीला फोन कॉल केला होता, त्यात तुमच्यासाठी खिचडी करून ठेवते, तुम्हाला शेवटच बघायचं आहे, असं दीपाली यांनी म्हटलं होतं.
 
 याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर, माजी क्षेत्र संचालकक एम. एस. रेड्डी यांचे अखेरीस निलंबन झाले आहे.