पुणे : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झालाय. गुरूवारी संध्याकाळी जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हटकर पुण्यात एरंडावणा परिसरात राहिला आहेत. घटना घडली त्यावेळी त्यांचे पती दिलीप कोल्हटकर आणि त्यांच्या आई घरामध्ये होत्या. दिलीप कोल्हटकर हे आजारी असतात. तर त्यांच्या आई बेडरुममध्ये टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी किचनमधून धूर येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी इमारतीमधील इतर लोकांना आगीची माहिती दिली. तेव्हा स्वयंपाक घरात दीपाली यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. 


सुरूवातीला पोलिसांनी होरपळून मृत्यू झाल्याची नोंद केली होती. मात्र शवविच्छेन अहवालाल दीपाली यांचा गळा आवळून तसंच डोक्यात मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याच स्पष्ट झालं. त्यामुळे दीपाली यांचा खून करुन मृत्यूदेह जाळून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 



या प्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली यांचं वय ६५ वर्ष आहे. एरंडवण परिसरातील मैथिली सोसायटीत राहत होत्या.